Home धर्म-समाज गदारोळात विधानसभेत ग्रामपंचायतीचे विधेयक संमत

गदारोळात विधानसभेत ग्रामपंचायतीचे विधेयक संमत


मुंबई प्रतिनिधी । पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. ग्रामपंचायतीच्या विधेयकावरून विरोधकांनी सभात्याग केला. तर गदारोळातच हे विधेयक मंजूर करण्यात आले.

दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. सत्ताधार्‍यांना घाई झाली असून कोर्टाच्या निर्णयाची वाट न पाहता हे विधेयक कशासाठी आणले जातेय असा प्रश्‍न त्यांनी केला. यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विधेयकाची आवश्यकता असल्याचे सांगितले. यानंतर प्रचंड गदारोळ सुरू असतांना सत्ताधार्‍यांनी हे विधेयक संमत केले. तर विरोधकांची याचा निषेध म्हणून सभात्याग केला.


Protected Content

Play sound