Home Cities जळगाव जळगावात अभेद्या फाऊंडेशनतर्फे चिमुकल्यांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप

जळगावात अभेद्या फाऊंडेशनतर्फे चिमुकल्यांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप

0
107

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मोरया प्रतिष्ठान ऑडिटर कॉलनी मित्र मंडळ आणि अभेद्याफाऊंडेशनतर्फे चिमुकल्यांच्या घरी आत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

मोरया प्रतिष्ठिान ऑडिटर कॉलनी मित्र मंडळ आणि अभेद्या फाऊंडेशनतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवव्या टप्प्यात गरजू कुटुंबाला ५ किलो गहूचे पीठ व तांदूळ १ किलो देण्यात आले. यावेळी मोरया प्रतिष्ठान ऑडिटर अध्यक्ष जयेश दसनुरकर, कौस्तूभ सुर्यवंशी, विवेक भावसार, दिपक वाणी आणि अभेद्या फाऊंडेशनच्या संचालिका वैशाली झाल्टे, महेश म्हस्के आदी उपस्थित होते. गरजू कुटुंबाला आवश्यक वस्तूचे वाटप करण्यात आल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.


Protected Content

Play sound