जळगाव शहरात कोरोनाचा स्फोट; जिल्ह्यात ७८० रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ७८० नवीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. आज जिल्ह्यात जळगाव शहरात तब्ब्ल २१५ एकाच दिवशी आढळून आले आहे. यासह चोपडा, चाळीगाव, पारोळा आणि अमळनेरात पुन्हा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. आजच ५६३ पेशंटनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ७८० कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक २१५ रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल चोपडा-८३, चाळीसगाव-७९, पारोळा -६९ तर अमळनेरात-६२ रूग्ण आढळून आले आहेत.

आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-२१५; जळगाव ग्रामीण-४२; भुसावळ-२२; अमळनेर-६२; चोपडा-८३; पाचोरा-२६; भडगाव-३३; धरणगाव-३८; यावल-२१; एरंडोल-८; जामनेर-४२; रावेर-२९; पारोळा-६९; चाळीसगाव-७९; मुक्ताईनगर-१; बोदवड-९ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १ असे एकुण ७८० रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर-५८१२; जळगाव ग्रामीण-१३९२; भुसावळ-१४६७; अमळनेर-२०३१; चोपडा-२१३५; पाचोरा-१०५१; भडगाव-११७५; धरणगाव-१२५२; यावल-८४९; एरंडोल-१५०९; जामनेर-१७७१; रावेर-१२९४; पारोळा-१२४९; चाळीसगाव-१५८७; मुक्ताईनगर-८००; बोदवड-३६५ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १३४ असे एकुण २५ हजार ८७३

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या २५ हजार ८७३ इतकी झालेली आहे. यातील १८ हजार ०८८ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ५६३ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ११ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ७८९ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ६ हजार ९९६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

Protected Content