मुंबई वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी जिम सुरु करा अशी मागणी केली होती. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी राज्यातील एक पडदा थिएटर सुरु करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनतर्फे सुप्रिया सुळेंना निवेदन देण्यात आले आहे.
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकपडदा थिएटर्स बंद आहेत. यामुळे राज्यातील एकपडदा थियटरचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. ती पुन्हा सुरु करावीत या मागणीचे निवेदन सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष नितीन दातार यांनी दिले आहे.”
यामध्ये एकपडदा थियटरचालकांच्या विविध मागण्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री आपणास नम्र विनंती आहे की,कृपया एकपडदा थिएटरचालकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा, असे ट्विट त्यांनी केले आहे.