यावल , प्रतिनिधी । येथील पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक अरूण धनवडे हे कोरोना या आजारावर मात करून घरी पहोचले. त्यांच्या शुभेच्छा भेटीसाठी व स्वागत करण्यासाठी पोलीस प्रशासनासह मोठया प्रमाणावर नागरीक येत आहेत
पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी तालुक्यात सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीच्या खडतर संकटासमयी आपला जिव धोक्यात घालुन सर्वसामान्य नागरिकांचा कोरोनापासुन रक्षण करण्यासाठी सतत पाच महीने अहोरात्र परिश्रम घेतले.
परन्तु या कार्यात ते स्वतः कोरोनाच्या विषाणु संसर्गाच्या लागण पासुन सुरक्षीत राहु शकले नाही. ते कोरोनाबाधित झाल्यानंतर वीस दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर त्यांच्या घरी सुखरूप आले आहेत. हे वृत कळताच पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांचे सहकारी व प्रभारी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार , पोलीस निरिक्षक विनोदरवांड बहाले, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांच्यासह त्यांचे पोलीस सहकारी मंडळीच्या वतीने त्यांच्या फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले.
दरम्यान, तहसीलदार जितेन्द्र कुवर व त्यांच्यासोबत निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांनी ही कोरोना योद्धा म्हणुन ओळख निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्याची भेट घेवुन त्यांच्या प्रकृतीबाबत आस्थेने विचारणा केली व त्यांना शुभेच्छा दिल्यात .