यावल प्रतिनिधी । तालुक्यात कोरोना संसर्गचा शिरकाव मागील एका आठवडयात वेगाने वाढला असुन काल एकुण २० रुग्ण मिळाले असुन यात एकाच गावात चक्क १९ कोरोना बाधीत रुग्ण मिळुन आल्याने एकच खळबळ उडाली असुन आरोग्य यंत्रणेची चांगलीच डोकेदु:खी वाढली आहे.
दरम्यान यावल तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठले असुन आजवर तालुक्यात कोरोना बाधीत आलेल्या रुग्णांची संख्याही ७४० च्यावर जावुन पहोचली असल्याची माहीती ही वैद्यकीय सुत्रांकडुन प्राप्त झाली आहे. यात आज तालुक्यातील अगदी कमी वस्तीचे आदीवासी गाव म्हणुन ओळख असलेल्या परसाडे या गावात मिळालेल्या २० बाधीत रुग्णांपैक्की १९ कोरोना बाधीत मिळुन आल्याने या आकडेवारीचा परिसरातील गावातील नागरीकांनी चांगला धसका घेतला असुन, तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची झोप उडवणारी आहे .
या संदर्भात यावल तालुक्यातील नागरीकांनी लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी कोरोना विषाणुचा मानवी जिवनाला अत्यंत घातक ठरणारा संसर्ग हा अद्याप आपल्यातुन हद्दपार झालेला नसुन नागरीकांनी शासन नियमाचे काटेकोर पालन करून मास्क वापरणे गर्दीच्या सार्वजनीक ठीकाणी सोशल डिस्टसिंगची शिस्त राखुन आपले स्वताचे आणी आपल्या कुटुंबाचे कोरोना पासुन रक्षण करावे असे प्रशासनाच्या वतीने प्रांत अधिकारी डॉ.अजीत थोरबोले , तहसीलदार जितेन्द्र कुवर , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे, यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांनी केले आहे .