जळगाव प्रतिनिधी । जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधत कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून कार्यरत राहणाऱ्या छायाचित्रकारांचा अँजल फूड फाऊंडेशनतर्फे गौरव करण्यात आला.
पत्रकार भवनात गुरुवारी पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफ्फार मलीक होते. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे अशोक भाटिया, माजी उपमहापौर करीम सलार, मुफ्ती अतीकुर रहमान, फारुक शेख, नगरसेवक रियाज़ बागवान, फारुक कादरी, इस्माईल पटेल, खलील पठान, अयाज़ अली आदी उपस्थित होते.
कोरोना काळात देखील छायाचित्रकार बांधव आपले कार्य पार पाडत आहे. कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या या सर्व छायाचित्रकारांचा सन्मान करणे आवश्यक असल्याचे मत अँजल फूड फाऊंडेशनचे अध्यक्ष दानियल अलाउद्दीन यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले तर आभार रेहमान शेख यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाप्रसंगी छायाचित्रकार सचिन पाटील, गोकुळ सोनार, आबा मकासरे,संदीपाल वानखेड़े, नितिन सोनवणे, भूषण हंसकर, निखिल सोनार, उमेश चौधरी, जुगल पाटिल, गणेश सुरसे, धर्मेंद्र राजपूत, वसीम खान, हेमंत पाटिल, सुर्यभान पाटिल, रितेश भाटिया, जकी अहमद, चेतन वाणी, अयाज मोहसिन, रईस शेख, संदीप माळी, एजाज शाह, चेतन निंबोळकर यांचा सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अँजल फूड फाऊंडेशनचे सदस्य अफसर पींजारी, फिरोज़ खान, तबरेज सैय्यद, इमरान खाटिक, रफीक, जावीद, साबिर, रेहान, रमज़ान, इमरान सैय्यद, समीर बागवान, रेहान बागवान, गणेश, ज़मीर, शारूख, निसार तडवी, कामिल, शादाब, राहिल यांनी परिश्रम घेतले.