यश प्रभा साडीज व मॅचींग सेंटरचे उद्घाटन

 

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जनता बँक संलग्न यश प्रभा महिला बचत गटाच्या साडीज आणि मॅचिंग सेंटरचे उद्घाटन बळवंत नागरी सह पतसंस्थेचे संचालक सतीश मदाने, जळगाव जनता बँकेच्या बचत गटाच्या प्रमुख वैशाली महाजन, सुलभा बाविस्कर, भाग्यश्री गायकवाड, नंदकुमार जंगले यांच्या हस्ते करण्यात आले.

परिसरातील व्यक्तींना माफक दरात साडीज, पंजाबी ड्रेस, टॉप व ड्रेस मटेरियल, ब्रँडेड आणि फॅन्सी गाऊन साहित्य, महिला बचत गटाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले. महिलांच्या हाताला काम देऊन स्वतःच्या पायावर सक्षम होण्यास या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा मिळत आहे तसेच गटातील महिला सदस्यांना आपल्या परिसरात व्यवसाय करायचा असल्यास त्यांना मालाचा पुरवठा महिला बचत गटामार्फत विना भांडवल केला जाईल अशी योजना बचत गटाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. यशप्रभा साडीज व मॅचिंग सेंटरच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांची जवळ जवळ सोय होणार आहे तसेच या बचत गटामार्फत चालवल्या जाणाऱ्या यश प्रभा साडीज सेंटरमध्ये सर्व नागरिकांनी एकदा अवश्य भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन यशप्रभा महिला बचत गटाच्या वतीने करण्यात आले आहे.याप्रसंगी यशप्रभा महिला बचत गटातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Protected Content