Home Cities जळगाव चिखलमय रस्त्याने नागरिक त्रस्त : शिवसैनिकांची नगरसेवकांच्या घरी धडक (व्हिडिओ)

चिखलमय रस्त्याने नागरिक त्रस्त : शिवसैनिकांची नगरसेवकांच्या घरी धडक (व्हिडिओ)

0
100

जळगाव, प्रतिनिधी । शिवाजीनगरला आतिशय चिखलमय रस्ते झाले आहे. चालायला सुद्धा रस्ता नाहीये. गेली दोन वर्षे शिवाजीनगरच्या नागरिकांना या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याविरोधात शिवाजी नगर शिवसेनेच्या विभाग प्रमुख विजय बांदल यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी भाजपाचे स्थानिक नगरसेवक नवनाथ दारकुंडे व गायत्री शिंदे यांच्या घरी चिखलात चालत जाऊन निवेदन देत चिखलामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली.

नगरसेवक नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे यांच्या घरी चिखलमय रस्त्यावर मोर्चा काढण्यात आला. पावसामुळे प्रभागातील धनाजी काळे नगर, भुरेमामलेदार हनुमान सॉमिल ते लाकूड पेठ गल्ली, कंकांच्या घरापासून ते क्रांती चौक ते शिवाजी नगर हुडकोतील संपूर्ण परिसर हा चिखलाने व गटारीच्या सांडपाण्याने तुंबला आहे. चिखलामुळे नागरिकांना रास्त्यावर चालणे देखील मुश्किल झाले आहे.

दुचाकींचे अपघात होत असून तुंबलेल्या पाण्याने नारिकांचे आरोग्य धोक्यात आले असून डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली करत लवकर रस्ता दुरुस्ती व गटारींची स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली. यामोर्चात शिवाजीनगर शिवसेना विभाग महिला वर्ग व माजी नगरसेवक अंकुल कोळी, उपमहानगरपालिका प्रवीण पटेल, शिवसैनिक मोहन जाधव उर्फ शेरा, शाखाप्रमुख कैलास गायकवाड, राजू सय्यद, राजू जाधव, किरण ठाकूर, लखन पवार, दत्तात्रय बांदल, विनोद तायडे, चेतन बांदल, सतीश बांदल आदींसह कल्पनाताई चोरटे व वार्डातील इतर महिला सहभागी झाल्या होत्या.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1610950429084248/


Protected Content

Play sound