Home Cities अमळनेर झाडी येथील तरूणाच्या खुनाचा उलगडा; मारवड पोलिसांना यश

झाडी येथील तरूणाच्या खुनाचा उलगडा; मारवड पोलिसांना यश


Crime 21

अमळनेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या झाडी येथील 23 वर्षाच्या तरूणाचा 23 फेब्रुवारी 2019 रोजी खुन केल्याप्रकरणी मारवड पोलीसात अज्ञान व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खून करणारे दुसरे किंवा तिसरे नसुन मयताचा भाऊ आणि आई असून त्यांनी या खूनाची कबुली दिली आहे. याबाबत महिती अशी की, मयत सुनिल सुभाष पाटील (वय-23) रा. झाडी यास अज्ञात आरोपीने अज्ञात कारणाने खून करण्यात आला होता. मारवाड पोलीस स्टेशन भाग 5, भादवी कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सपोनि समाधान पाटील यांच्यासह निलेश शेंबडे, भागवत पाटील, रोहिदास जाधव, पोहेकॉ संजय पाटील, पो.ना.सुनिल आगोने, फिरोज बागवान, सचिन निकम, सुनील तेली, भास्कर चव्हाण, चालक दिनेश कुलकर्णी, विजय होळकर यांची कारवाई करत तपास केला असता सदर गुन्हात मयताच्या भाऊ गणेश पाटील व आई संगीता पाटील यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound