अडावद, ता. चोपडा । फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करून धार्मिक भावना दुखावल्याने येथील एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
अडावद येथील शेख इक्बाल शेख निमन (वय ४२) याने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून १६ डिसेंबर २०१९ रोजीची एक वादग्रस्त पोस्ट १५ ऑगस्टच्या रात्री व्हायरल केली. हा प्रकार रविवारी समोर येताच अडावद गावात खळबळ उडाली. या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी गावातून करण्यात आली.
दरम्यान, या प्रकाराची पोलिसांनी दखल घेतली. या संदर्भात नंदलाल मोतीलाल महाजन (रा.मधला माळी वाडा, अडावद) यांच्या फिर्यादीनुसार शेख इक्बाल शेख निमन याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधीत आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे उपनिरीक्षक यादव भदाणे, योगेश गोसावी, गोविंद येरनुळे, जगदीश कोळंबे, नासिर तडवी, भांगडा बारेला यांनी यांनी गावात बंदोबस्त राखला आहे.