नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च्या बचतीमधील २१ लाख रुपये कुंभमेळ्यातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी मदतनिधी म्हणून दिले आहेत. कुंभ मेळ्यात कार्यरत असलेल्या संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांच्या नियोजनाबद्दल मोदींनी उ.प्र. चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुकही केले आहे. तसेच हा कुंभमेळा पुढील कित्येक वर्षांसाठी प्रेरणादायी अन् ऊर्जा देणारा ठरेल, असेही मोदींनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशच्या सर्वच जनतेचं विशेषत: प्रयागराज येथील नागरिकांचं आणि प्रयागराज येथे कुंभमेळ्यात कार्यरत असलेल्या प्रत्येक घटकाचे मोदींनी कौतुक केले आहे. या कुंभमेळ्यातून जगाला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले आहे. तर, पुढील कित्येक वर्षांसाठी या कुंभमेळ्यातील उत्साह आपणास प्रेरणा आणि ऊर्जा देणारा ठरेल, असेही मोदींनी म्हटले आहे.