भडगाव (प्रतिनिधी)। भडगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र महादू पाटील यांनी आपल्या पदाचा सव्वावर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने बुधवार 6 मार्च रोजी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजेंद्र पाटील यांनी 30 ऑक्टोंबर 2017 रोजी भडगाव नगराध्यक्ष पदाची सुत्रे स्विकारली होती. यापुर्वी राष्ट्रवादीचे प्रशांत पवार हे नगराध्यक्ष होते. त्यांनीदेखील सव्वा वर्षाचा कार्यकाळ पद संभाळले.
आता भडगाव नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे नगराधक्षपदासाठी अतुल रमेश पाटील हे दावेदार असल्याचे राजकीय पक्षाकडून बोलले जात आहे. नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आपल्या राजीनामा दिल्यानंतर नवीन नगराध्यक्ष पदाची निवड कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.