Home आरोग्य कोरोनाच्या उपचारासाठी खासदार नवनीत राणा नागपूरहून मुंबईला रवाना

कोरोनाच्या उपचारासाठी खासदार नवनीत राणा नागपूरहून मुंबईला रवाना


अमरावती (वृत्तसंस्था)अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा या कोरोनाच्या उपचारासाठी नागपूरहून मुंबईला रवाना झाल्या आहेत. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात नवनीत राणा उपचार घेणार आहेत.

 

नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. आता पुढील उपचारासाठी त्या मुंबईला रवाना झाल्या आहेत. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात नवनीत राणा उपचार घेणार आहेत. सध्या त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असून त्यांच्या छातीत खूप दुखत असल्याची माहिती आहे. दरम्यान, ६ ऑगस्टला नवनीत राणा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यासह पती तथा आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे आशा कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नवनीत राणा यांना उपचारासाठी नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


Protected Content

Play sound