जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्हयातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी ‘कोविड-१९ काळात विद्यार्थ्यांना शिकविण्याचे माझे अभिनव प्रयोग’ या विषयावर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूमुळे शैक्षणिक संस्था बंद असल्याने ऑनलाईन वर्ग घेऊन काही वेगळे प्रयोग करून शाळा व महाविद्यालयांमधील शिक्षक शिकवीत आहेत. या अभिनव प्रयोगाची माहिती फोटो/व्हिडीओ प्रेझेंटेशन असलेला व्हिडीओ (जास्तीत जास्त २०० सेकंद लांबीचा) तयार करून या स्पर्धेसाठी शिक्षक व प्राध्यापकांनी २९ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत [email protected] या ई-मेलवर पाठवावेत. प्राप्त व्हिडीओची तज्ज्ञांकडून छाननी केली जाईल. प्राध्यापक आणि शिक्षकांना स्वतंत्र असे प्रथम क्रमांकासाठी रूपये ३०००, द्वितीय रूपये २००० आणि तृतीय क्रमांकासाठी १००० रूपयांचे बक्षीस व प्रमाणपत्र जाहीर ऑनलाईन कार्यक्रमात देण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेत शिक्षक व प्राध्यापकांनी अधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या विभागाचे प्रभारी संचालक प्रा.मनिष जोशी यांनी केले आहे.