भुसावळ प्रतिनिधी । नशिराबाद शिवारातील रेल्वे उड्डाण पुल लगत असलेल्या ओरिएंट सिमेंट कंपनीतील कंत्राटी कामगारांनी रिपाइं मजदूर सेनेच्या पदाधिकार्यांसोबत दि.१० पासून कंपनीसमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे.
या बाबत वृत्त असे की, कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या कंपनी प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आल्या होत्या.मात्र त्याच्यावर कुठलीही अंमलबजावणी झाली नसल्याने कामगारांनी आज आंदोलनाला सुरुवात केली. यात ११ रोजंदारी कामगारांना न सांगता कामावरून काढणे,वारंवार कंपनी प्रशासनाकडून कर्मचार्यांना होणारा त्रास व सुविधांबद्दल तक्रारी कामगारांनी केल्या आहे. राष्ट्रीय मजदुर सेनेचे महामंत्री जगन सोनवणे, राकेश बग्गन, हरीश सुरवाडे यांच्या नेतृवाखाली आंदोलनात सुमारे दोनशे कामगार सहभागी होते.
आशिया महामार्ग क्रमांक ४६ वर सकाळी आठ वाजेपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले.मागण्या मान्य न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी अर्धनग्न मोर्चा भुसावळ येथे काढण्यात येणार आहे. यानंतर दि२० रोजी मुंबई येथे राज्यपालांच्या निवासस्थानासमोर मोर्चा तर जळगाव येथे रेल रोको करण्यात येणार आहे. पोलीसांनी सांगितल्याने सर्व आंदोलन शांतता व लोकशाही मार्गाने सुरू आहे मात्र कंपनी प्रशासन लक्ष देत नसल्याने आंदोलन करावे लागत असून ते तिव्र स्वरूपाचे राहील असे रिपाइं मजदूर सेनेचे अध्यक्ष जगन सोनवणे यांनी सांगितले.
यावेळी रिपाइं मजदूर सेनेचे अध्यक्ष जगन सोनवणे, कामगार अध्यक्ष सचिन भालेराव,उपाध्यक्ष लक्ष्मण तायडे,सचिव तुषार पाटील, संघटक जितेंद्र बर्हाटे,सह सचिव तेजस कोळी,कोषाध्यक्ष मुकेश पाटील, सल्लागार दिपक झोपे, सदस्य अरूण केदार, संतोष भोई,किरण पाटील,अमोल माळी,आबा महाजन,संदीप पाटील,निखील चौधरी,महेश भंगाळे,संजय कोळी आदी सहभागी होते. यावेळी नशिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनि साळुंके यांनी त्यांच्या सहकार्यांसह बंदोबस्त राखला.