एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील खडके खुर्द येथे शासनाच्या शेत पाणंद योजनेतून धनसिंग विठ्ठल पाटील यांचे शेता पासुन ते शिवाजी सुकलाल पाटील यांच्या शेतापर्यंत शेत रस्त्याच्या कामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच साहेबराव पाटील यांनी नारळ वाढवून या रस्त्याच्या कामाचे उदघाटन केले. याप्रसंगी बापु पाटील,दत्तू पाटील,विलास पाटील,राजेंद्र पाटील,खडकेसिम चे माजी सरपंच राजेंद्र पाटील हजर होते. या रस्त्यामुळे परिसरातील शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. याचे मूल्य ९८ हजार रूपये इतके असून हे काम लवकर पूर्ण होण्याची परिसरातील शेतकर्यांना अपेक्षा आहे.