Home क्राईम यावल येथे दहावीच्या परिक्षार्थींना मारहाण

यावल येथे दहावीच्या परिक्षार्थींना मारहाण

0
107


यावल प्रतिनिधी । येथे दहावीची परिक्षा देणार्‍या दोघांना जमावाने मारहाण केल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, यावल येथील साने गुरुजी उच्च माध्यमिक विद्यालयात १०वी परिक्षा सुरु आहे. आज दुपारी २ वाजेच्या सुमारास परिक्षा पेपर सुटल्यावर चोपडा येथील परवेज मुसा तेली (वय १९ वर्ष, राहणार चोपडा) व दानीश बेग इरफान बेग ( वय २२ वर्ष रा. चोपडा) या दोघा बाहेरून दहावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना तीस ते चाळीस तरूणांनी लोखंडी रोड व इतर वस्तुने बेदम मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली. या दोन्ही विद्यार्थांना तात्काळ उपचारा साठी द्यावल च्या ग्रामीण रुग्णालयात या दोघ विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. पोलीस निरिक्षक डी.के. परदेशी यांनी शहरात पोलीस बंदोबस्त वाढविला असून कुणीही अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound