पिकअप वाहनाने तीन चिमुकल्यांना चिरडले ; एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी

चंद्रपूर (वृत्तसंस्था) एका भरधाव पिकअप वाहनाने तीन चिमुकल्यांना चिरडल्याची घटना गोंडपिंपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथे घडली. या अपघातात एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाली आहेत.

 

आष्टी-गोंडपिंपरी मार्गाला लागून असलेल्या पंढरी मेश्राम यांच्या घराच्या अंगणात भरधाव पिकअप वाहन घुसले. त्यामुळे अंगणात असलेल्या अलेशा मेश्राम (७) या मुलीचा मृत्यू तर अस्मित मेश्राम (१०) आणि माही रामटेके (१२) या गंभीर जखमी झाले आहेत. वाहन भरधाव वेगात असल्याने अंगणात जोराचा आवाज झाला. त्यानंतर लहान मुलांच्या किंकाळ्यांचा आवाज आल्याने घरातील माणसे आणि परिसरातील नागरीक घटनास्थळी धावत सुटली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

Protected Content