माझ्यावर गुन्हा दाखल करा अटक करा, मी घाबरत नाही : प्रकाश आंबेडकर

औंरगाबाद (वृत्तसंस्था) आपला लॉकडाऊनला पाठिंबा नाही, हे दर्शवण्यासाठी ज्या झेंड्याला तुम्ही मानत असाल तो झेंडा लोकांनी घरी, गच्चीवर फडकवा. तिरंगा फडकवलात तर अधिक चांगले होईलं. असेही ते म्हणाले. असं आवाहन केल्याने माझ्यावर गुन्हा दाखल करा अटक करा, मी घाबरत नाही, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्यांनी जनतेला लॉकडाऊन न पाळण्याचे आवाहन केले आहे.

 

 

औंरगाबाद येथील पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलतांना पुढे म्हणाले की, भूकबळी आणि इतर आजारामुळे लोक मरत आहेत. जे हाल परराज्यातील कामगारांचे झाले तेच हाल लहान उद्योजकांचे होत आहेत. ३ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने सार्वजनिक वाहतूक सुरू करा असे आवाहन त्यांनी शासनाला केले आहे. तसेच १ तारखेपासून सर्वांनी दुकानं, टपऱ्या टायपिंग इन्स्टिट्यूट उघडा तसेच रिक्षावाल्यांनीसुद्धा फिरायला सुरू करा असे देखील आवाहन आंबेडकर यांनी जनतेला केले.

Protected Content