Home राष्ट्रीय मणिपूरमध्ये लष्काराच्या जवानांवर दहशतवादी हल्ला ; तीन जवान शहीद, सहा जखमी

मणिपूरमध्ये लष्काराच्या जवानांवर दहशतवादी हल्ला ; तीन जवान शहीद, सहा जखमी


मणिपूर (वृत्तसंस्था) मणिपूरमध्ये लष्काराच्या जवानांवर ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असून, यात तीन जवान शहीद तर ६ जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

 

मणिपुरची राजधानी इम्फालमधून १०० किलोमीटर दूर चंदेल जिल्ह्यात अतिरेक्यांच्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे ३ जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी हे एक लोकल ग्रुप पीपुल्स लिबरेशन आर्मीचे होते. भारत-म्यांमार सीमेवर अतिरेकी समूहांविरोधात ऑपरेशन सुरू करण्यात आलेले होते. यादरम्यान जवान अतिरेक्यांच्या कचाट्यात सापडले. निशाणा लावून बसलेल्या अतिरेक्यांनी जवानांवर गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर सैन्याने अतिरेक्यांचा शोध घेत आहेत. या हल्ल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांच्या शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरु केली आहे. त्याचबरोबर भारत-म्यानमार सीमेवरील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.


Protected Content

Play sound