वो भी शामिल था, ‘बहार-ए-वतन’ की लूट में, फक़ीर बन के आया था वो, लाखों के सूट में !

मुंबई (वृत्तसंस्था) वो भी शामिल था, ‘बहार-ए-वतन’ की लूट में, फक़ीर बन के आया था वो, लाखों के सूट में, अशा शेर काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते राजीव सातव यांनी ट्विट करून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.

 

राजस्थानातील राजकीय संघर्षानंतर काँग्रेसने भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींसह भाजपावर टीका करत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते राजीव सातव यांनी वो भी शामिल था, ‘बहार-ए-वतन’ की लूट में, फक़ीर बन के आया था वो, लाखों के सूट में । असा शेर ट्विट करून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. लाखो रुपयाच्या सूटमध्ये फकीर म्हणून आलेली व्यक्तीही देशाला लुटण्यामध्ये सहभागी होती, असा या शेरचा अर्थ होत असून, सातव यांनी यातून अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधला आहे. दरम्यान, महाराष्ट्र भाजपा यावर काय उत्तर देते याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.

Protected Content