भुसावळ प्रतिनिधी । नगरपरिषदेत कायम व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे पगार थकल्याने तात्पुरते मुख्याधिकारी यांनी नियुक्ती करावी अशी मागणी नगरपालिका वर्कर्स युनियनच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ नगरपरिषदेत काम करणाऱ्या आस्थापना सुचीवरील कायम कर्मचारी व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन तसेच सेवानिवृत्ती वेतन हे मिळालेले नाही. सध्या कोरोनाचे संकंटातून कर्मचारी मार्गक्रमण करत असुन अशा संकट परिस्थितीत काम करत आहेत. कायम मुख्याधिकारी यांची प्रशासकीय बदली शाल्यानंतर त्यांचे जागेवर मुख्याधिकारी रमाकांत डाके ८ जुलै २०२० पासून भुसावळ नगरपरिषदेत रुजु होऊन दुसऱ्या दिवसापासुन अद्यापपावेतो कार्यालयात आलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचीत रहावे लागत आहे. तरी शासनाने तात्पुरत्या स्वरुपात मुख्याधिकारी यांची नेणक केल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन, दवाखाना व आरोग्य विभागाशी संबंधीत कामे लवकर होतील अशी मागणी नगरपालिका वर्कर्स युनियनच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर शाबीर तडवी, एस.यु.सुरवाडे, प्रमोद मेढे, आर.व्ही.पाठक, ङिए.मंदवडे, निर्मल वाणी, संजय पाटील, ए.डी.सपकाळे, शेख परवेज, संजय पवार, दिपक फुलपगार, सुरेश घेंगट, राजेश सिसोदिया, सतीश बेदरकर, एस.के.नटकर, एस.आर.धनगर आदी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.