भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल येथे ७८ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ६ वाजेपासूनच देशभक्तीपर गीते रांगोळीची सजावट, तिरंगी पताका अशी जय्यत तयारी करण्यात आली होती.
ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक एस जी मेढे यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी वरिष्ठ शिक्षिका सरला सावकारे, शालिनी बनसोडे, नगरपालिका प्रशासन कार्यालयाचे जगदीश चौधरी, यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
ध्वज संचलन डॉ. प्रदीप साखरे यांनी केले. विद्यार्थीनींकडून देशभक्तीपर गीते संध्या धांडे यांनी सादर केली. नंतर विद्यार्थ्यांना चॉकलेट, लाडू वाटप करण्यात आले. शाळेचे प्रयोगशाळा सहाय्यक, के.डी. चौधरी यांनी सर्व विद्यार्थ्यांना वडापाव,जिलेबी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन नाना पाटील यांनी केले.