जळगाव प्रतिनिधी । शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील वसतीगृह येथे कोविड सेंटर आहे. तिथे रुग्णांबाबाबत निष्काळजीपणा केला जास्त असून प्रवेशद्वाराजवळील व्यक्ती हे अर्वाच्य भाषा रुग्णांच्या नातेवाईकांशी वापरत असल्याच्या अनेक तक्रारी काहींनी “लाईव्ह ट्रेंड्स न्यूज”च्या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवरून केल्या.
विविध गैरसोयींचा पाढाच वयोवृद्ध नागरिकाने आणि काही महिलांनी मांडला. गेल्या आठवड्यात एका रुग्णाच्या जेवणाच्या ताटात झुरळ व खिळाही मिळून आला होता पण सुटका झाल्यावर सुद्धा केवळ कोविड रुग्णांसाठी महापालिका व जिल्हा प्रशासन झटते आहे, म्हणून सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेऊन त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार देण्याचे टाळले होते. त्याचप्रमाणे ‘त्या’ कोविड सेंटर मध्ये मिळणारे जेवण हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून गुणवत्ताही समाधानकारक नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे. एकतर आम्हाला लेखी पत्र द्यावे आम्ही घरून डबा आणू रुग्णांच्या आरोग्याशी खेळू नका असे सांगत रुग्णांची तपासणी दररोज करण्यात येत नाही. डॉक्टरांचा क्वचितच फेरफटका असतो, त्यात सातत्य नसते तसेच कोविड सेंटरमधील कर्मचारी उद्धट स्वरूपाची भाषा वापरत असतात व बेजबाबदारपणे वागतात असेही काही तक्रारदारांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. या बाबींकडे नोडल ऑफिसर तसेच वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष घालावे अशी आग्रही मागणी होत आहे.