जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील असोदा सार्वजनिक विद्यालयात नुकताच विज्ञान दिन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान पाठ्यपुस्तकातील विविध आकृत्या रांगोळीच्या माध्यमातून काढल्या.
हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष विलास चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा व परिसरातील प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करावे. तालुका विज्ञान समन्वयक गोपाळ महाजन यांनी विज्ञान दिनामागची भूमिका व सी व्ही रमण यांच्या शोधबद्दल माहिती सांगितली. याप्रसंगी मुख्याध्यापिका विद्या खाचणे, पर्यवेक्षक डॉ मिलिंद बागुल, विज्ञान शिक्षक एल जे पाटील, प्रेमराज बरहाटे, सचिन जंगले, डी जी महाजन, वृषाली चौधरी, हेमलता साळुंखे उपस्थित होते. नंतर वैज्ञानिक रांगोळीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष विलास चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. विदयार्थ्यांनी विज्ञान पाठ्यपुस्तकातील विविध आकृत्या रांगोळीच्या माध्यमातून काढल्या. या उपक्रमात शाळेतील सर्व स्तरातील विद्यार्थाना भाग घेता आल्यामुळे सर्वानी त्यांचे व उपक्रमाचे विशेष कौतुक केले.