तरुणीच्या माध्यमातून भाच्याला पाठवले अश्लील संदेश ; भाजप आमदारासह तिघांविरोधात गुन्हा

औरंगाबाद (वृत्तसंस्था) जुन्या कौटुंबिक वादातून एका तरुणीच्या माध्यमातून आपल्याच भाच्याला अश्लील संदेश पाठवून त्रास दिल्याप्रकरणी बदनापूरचे आमदार नारायण कुचे, त्यांचा भाऊ देविदास कुचे आणि अश्‍लील संदेश पाठविणाऱ्या संबंधित तरुणीविरोधात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

या प्रकरणी पीडित तरुण दीपक डोंगरे याने चंदनझिरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, तक्रारीची पोलिसांनी दखल न घेतल्यामूळे दीपकने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. तेव्हा सुनावणीदरम्यान न्या. तानाजी व्ही. नलावडे व न्या. श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने संबंधित दीपक डोंगरे यांच्या २ मार्च रोजीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश पोलिसांना दिले. डोंगरे हे व्यवसायानिमित्त सख्खे मामा आमदार नारायण कुचे यांच्याकडे वास्तव्यास होते. डोंगरेंनी कुचे यांना ४० लाख रुपये निवडणुकीसाठी दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कुचे परिवाराने त्यांच्या मुलीशी डोंगरे यांचा विवाह लावून देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तो डोंगरेंसह त्यांच्या नातेवाइकांना मान्य होता. यातून कुचे परिवारातील मुलीशी डोंगरे यांचे प्रेम जुळले. परंतू डोंगरेंनी पैशांच्या मागणी केल्यानंतर आमदार नारायण कुचे यांना प्रेमप्रकरणाविषयी समजले. दरम्यान, कुचे यांचा राग अनावर होऊन त्यांनी त्यांचे बंधू देविदास कुचे असे दोघांनी मिळून आपल्याविरोधात षडयंत्र रचून एका तरुणीस अश्‍लील संदेश पाठविण्यास सांगून आपणास जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नव्हे तर आमदार कुचे यांनी कंत्राटाचे प्रमाणपत्र रद्द करून काळ्या यादीत टाकतो, काटा काढतो अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Protected Content