अखेर जप्त केलेल्या वाळूसाठाचा लिलाव होणार !

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यात विविध ठिकाणी अवैधरित्या आढळून आलेला वाळूचा साठा पोलीस पथक आणि महसूल पथकाने जप्त केला होता. या वाळूसाठ्याचा आता लिलाव करण्यात येणार असून १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भडगाव तहसील कार्यालयात अटी व शर्तीवर बंद लिफाफ्यातील निविदेद्वारे लिलाव करण्यात येणार आहे.

भडगाव तालुक्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे वाहनातील वाळू महसूल पथकाने पकडली होती. यात ७३ ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या वाळूची विल्हेवाट लावणेकामी सदर वाळू साठ्यांचा लिलाव करणेकामी सदरील वाळूची रक्कम रु.600/- प्रतिब्रास प्रमाणे अपसेट प्राईस निश्चित करण्यांत आलेली आहे. त्यानुसार सदरील वाळूचा दि.12/10/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय, भडगाव येथे अटी व शर्तींवर बंद लिफाफ्यातील निविदेद्वारे लिलाव करण्यांचे निश्चित करण्यांत आलेले आहे.
तरी लिलाव घेऊ ईच्छिणाऱ्या नागरीकांनी विहीत नमून्यातील निविदा अनामत रक्कमेच्या डी.डी. सह दि.11/10/2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपावेतो तहसिल कार्यालय भडगाव येथे जमा कराव्यात. लिलावाबाबत अधिक माहिती साठी गौण खनिज शाखा तहसील कार्यालय भडगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी केले आहे.

Protected Content