शेंदूर्णी, प्रतिनिधी । प्रत्येक ठेकेदाराने विकास कामे करतांना आपल्या कामामुळे आपले नाव कायम जनतेच्या स्मरणात राहील असे दर्जेदार कामे करावी ज्यामूळे नगरपंचायत पदाधिकारी यांची सुध्दा मान उंचावेल व गावचे नाव होईल असे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी सांगितले. ते नगरपंचायत मार्फत विविध कामांचे भूमिपूजन आज दि ४ जुलै रोजी सकाळी पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी बोलत होते.
गावांत विविध कामांचे भूमिपूजन प्रसंगी भाजपचे नेते गोविंद अग्रवाल यांनी प्रस्ताविक केले. अमृत खलसे यांनी येत्या काळात अनेक विकासाची कामे ही गावाची प्रगती दर्शवणारी असतील असे नमूद केले. शेंदूर्णी नगरपंचायत मार्फत ईश्वर नगरमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ट्रीमिक्स काँक्रीटीकरण रोडचे भूमिपूजन शेंदूर्णी नगरपंचायत उपनगराध्यक्षा चंदाबाई गोविंद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. तर नामदेव नगरमध्ये नगरसेवक गणेश पाटील यांच्या हस्ते , दत्त नगर रस्त्याचे भाजपचे नेते गोविंद अग्रवाल यांनी रस्ता लोकार्पण केले. माहेश्वरी मंगल कार्यालय रस्ता अमृत खलसे यांनी लोकार्पण केला . स्टेट बँक रस्त्याचे भूमिपूजन मुख्याधिकारी साजिद पिंजारी, व अमृत खलसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका साधना शंकर बारी, ज्योती संजय गायकवाड, भाजपचे नेते गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, नगरसेवक नीलेश थोरात, गणेश पाटील , शरद बारी, राहुल धनगर, शाम गुजर, अलीम तडवी, श्रीकृष्ण चौधरी, योगेश बारी, विजय धुमाळ, संजय गायकवाड, शंकर बारी, ललवाणी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद खलचे,शिक्षक विजय नाईक, बारकू जाधव, संजय पाटील,शंकर भोई व परिसरातील नागरिक उपस्थित होते.यावेळी ठेकेदार मोहीत पाटील,प्रणव पाटील यांच्यातर्फे उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल, नगरसेविका .साधना बारी,.ज्योती गायकवाड,मुख्याधिकारी साजिद पिंजारी, भाजपचे नेते गोविंद अग्रवाल, अमृत खलसे व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला .