Home क्राईम धक्कादायक : अहमदनगरमध्ये पिता-पुत्राची आत्महत्या !

धक्कादायक : अहमदनगरमध्ये पिता-पुत्राची आत्महत्या !

0
38



अहमदनगर (वृत्तसंस्था)
जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पिता-पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर हद्दीतील संजीवनी येथे आज सकाळी उघडकीस आली आहे. राहुल संजय फडे (२७) आणि संजय रंगनाथ फडे (५०) अशी मृतांची नावे आहेत.

 

 

मुलाने राहत्या घरी रात्री बारा वाजेच्या सुमारास पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. यानंतर मुलाने आत्महत्या केल्याचे पाहताच वडिलांनी देखील पहाटे ५ वाजेच्या सुमारास गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरातील किरकोळ वादातून पिता-पुत्राने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र, या आत्महत्येंमागील खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.


Protected Content

Play sound