नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जेवण देण्यास नकार दिला म्हणून मुलाने आपल्याच आईला गोळ्या घालून ठार मारल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे.
सूरज नामक तरुण दररोज दारू पीत असल्यामुळे आई बाला देवी (वय 60) त्याला टोकत होती. यावरून सुरज आईशी नेहमीच भांडण करत असायचा. गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास सुरज घरी आल्यानंतर त्याने जेवण मागितले. त्यावर आईने त्याला पुन्हा दारूबाबत टोकले. यावर संतापलेल्या सुरजने खोलीत ठेवलेला देशी कट्टा बाहेर आणत आईच्या डोळ्यावर गोळी झाडली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी सूरजला अटक असून या घटनेत वापरलेला कट्टाही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.