यावल-चोपडा रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; चार जखमी

यावल प्रतिनिधी । यावल-चोपडा मार्गावरील रस्त्यावर फॉरेस्ट कार्यालयाजवळ आज दुपारी १ वाजेच्या सुमारास २ दुचाकी मोटर वाहनांचा अपघात होवुन यात ४ जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,  सावदा तालुका रावेर येथील राहणारे संतोष किसन भोई (वय-३०) व भुसावळ येथील राहणाऱ्या आशा विनोद भोई (वय २५) हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीडी ५८६२) या वाहनाने सावदाहुन तोरखेडा तालुका शहादा येथे बहीणीकडे जाण्यास निघाले असतांना यावल-चोपडा मार्गावर शहरापासून जवळ असलेल्या वनविभागाच्या कार्यालयासमोर दोन दुचाकींची  समोरासमोर धडक झाली. या अपघातात संतोष भोई, आशा भोई व अन्य दोघे असे चार जण जखमी झाले. 

यातील दोन गंभीर जख्मींना ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार केल्यावर त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय जळगाव पाठवण्यात आले असुन , घटनेच्या ठीकाणी पोलीस कर्मचारी पंचनामा करण्यात येत आहे.  अपघातातील जख्मीना मदतीसाठी रिपाईचे कार्यकर्त विष्णु पारधे,  भिका भोई यांच्यासह काही नागरीकांनी सहकार्य केले. दरम्यान यावल चोपडा मार्गावरील रस्त्याची अवस्थाही अत्यंत दयानिय झाली आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असून देखील यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामचुकार कारभाराऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्यावर ही याची साधी दखल घेतली जात नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागा कार्यपद्धती बाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे .

Protected Content