


पुणे (वृत्तसंस्था) पती व मुलींना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी जबरदस्तीने विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. प्रबोधन सुनील गोरे (वय:२६, ज्ञानेश्वर नगर, कोंढवा खुर्द, पुणे) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
फिर्यादी महिला पती व दोन मुलींसह कोंढवा खुर्द येथे राहत असून आरोपी व महिलेचा पती हे मित्र आहेत. आरोपीचे महिलेच्या घरी येणे जाणे असल्याने दोघांची ओळख होती. ६ मे रोजी सदर पिडीत महिला नऱ्हे येथील नवले हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी नवले हॉस्पिटलच्या बाहेर उभा होता. त्यावेळी त्याने तु माझ्या सोबत ये नाहीतर तुझ्या पतीला व मुलींना ठार मारून टाकेन असे सांगत सदर महिलेस गाडीवर बसवून नऱ्हे येथील लॉजवर नेत बलात्कार केला. तसेच तू याबद्दल घरी कोणास सांगितले तर बघ अशी धमकीही त्याने दिली. अशाप्रकारे आरोपीने वेळोवेळी जबरदस्तीने महिलेच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध निर्माण केले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.



