रावेर, प्रतिनिधीं । तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात वसलेल्या पाल या गावात परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी स्थापित श्री वृन्दावन धाम आश्रम असून यावर्षीचा गुरुपौर्णिमा महोत्सव स्थगीत करण्यात आला असून गुरुपुर्णिमा आपआपल्या घरीच साजरी करण्याचे आवाहन आश्रमाचे विद्यमान गादीपती श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांनी सोशल मीडियातून केले.
दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र सह मध्यप्रदेश मधून शेकडो किलोमीटर हुन हजारो चैतन्य साधक पायी दिंडी प्रवास करीत येत असतात. परंतु, त्यावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच परिवाराचे पाल सह कन्नड व मध्यप्रदेशातील चारुकेश्वर , हरसूद,व शबरी धामआम्बा या आश्रमाचे मुख्यद्वार गुरुपौर्णिमेच्या दिवशी बंद करण्यात येणार आहेत. फक्त आश्रमातील साधु संताकडूंन सकाळी पादुका पूजन, त्यानंतर दहा वाजेला श्रधेय संत गोपाल चैतन्यजी महाराज यांचे सत्संग, आरती सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा ‘चैतन्य चॅनल’ च्या माध्यमातून ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण दिसणारआहे. भाविकांनी घरिच राहून परिवारसह याचा लाभ घ्यावा व हा कार्यक्रम साजरा करावा असे श्रधेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज व समिति तर्फे आवाहन करण्यात आले आहे.