आयुर्वेदद्वारे स्वस्थ जीवन दिले, हा गुन्हा आहे का? : रामदेव बाबांचा सवाल

देहरादून (वृत्तसंस्था) पतंजलीने बीपी, डायबिटीज, थायरॉईड, कॅन्सर सारख्या विविध आजारांची लागण झालेल्या कोट्यवधी लोकांना जीवन दिले आहे. पतंजलीने गेल्या तीन दशकात 10 ते 20 कोटी लोकांना प्रत्यक्ष आणि जगभरातील 200 कोटी पेक्षा जास्त लोकांना योग, आयुर्वेदद्वारे स्वस्थ जीवन दिलं आहे. हा गुन्हा आहे का?, असा प्रश्न योगगुरु रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

 

आज (बुधवार) बाबा रामदेव यांनी कोरोनिलवर स्पष्टीकरण दिले. दरम्यान, हे औषध अधिक प्रभावी असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. जर रोगमुक्त भारत करणे हा गुन्हा असेल तर मी तो गुन्हा करणार, असेही ते म्हणाले. दरम्यान, आयुष मंत्रालयाला संपूर्ण अहवालही सोपवल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोनिल औषधाच्या प्रयोगासाठी ज्यांची परवानगी घ्यायची होती, त्या सर्वांचे प्रमाणमंत्र आम्ही आयुष मंत्रालयाकडे सुपूर्द केले आहेत”, असे रामदेव बाबा म्हणाले. याशिवाय पतंजलीच्या प्रयत्नाचे आयुष मंत्रालयाने कौतुक केले आहे, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनिलमध्ये गिलॉय, अश्वगंधा आणि तुळस यांचं योग्य प्रमाणातील मिश्रण आहे. कोरोनिल आणि श्वासारी यांची संयुक्त चाचणी करण्यात आली. आम्ही याची निरनिराळी चाचणी केली नाही. पतंजली लोकांचे जीवन वाचवण्याचे काम करतो त्यांचा जीव घेण्याचे काम करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Protected Content