ती ‘चार’ औषधे प्रभावहीन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात येणारी चार औषधें प्रभावी नसल्याचे सिद्ध केले आहे. यात रेमडेसिवीर, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, लोपिनॅविर आणि इंटरफेरॉन या औषधांचा समावेश आहे.

रेमडेसिवीर या औषधचा भारतासह जगभरात सुरू असलेला प्रयोग मात्र सध्या सुरूच ठेवण्यात येणार आहे. जो पर्यंत ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटीकडून सूचना मिळत नाहीत, तो पर्यंत रेमडेसिवीरचा वापर सुरूच राहील, असे आयसीएमआर नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टीट्यूटचे संचालक समीरण पांडा यांनी म्हटले आहे.
नॅशनल टास्क फोर्स आणि जॉइंट मॉनिटरिंग ग्रुपशी चर्चा केल्यानंतर समीक्षा केली जाईल, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटले आहे. आम्ही आमच्या क्लिनिकल प्रोटोकॉलचा आढावा घेऊ आणि त्यात आवश्यकते बदल करू, असे आणखी एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. आम्हाला पुढे रेमडेसिवीरचा उपयोग करायचा आहे की नाही, हे ठरविण्यासाठी संशोधन आवश्यक आहे. आम्ही सॉलिडॅरिटी ट्रायलच्या पुराव्यांती समीक्षा करत आहोत, असेही अधिकारी म्हणाला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासात या औषधाचा किती परिणाम होतो यासाठी हजारो लोकांची तपासणी करण्यात आली होती. जागतिक आरोग्य संघटनेने सहा महिने हा अभ्यास केला. रेमडेसिवीर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, लोपिनॅवीर आणि इंटरफेरॉन या औषधांचा कोरोना बाधित रुग्णांवर अतिशय कमी परिमाम जाणवला किंवा अजिबातच परिणाम जाणवला नसल्याचे या अभ्यासात आढळून आले.

Protected Content