Home आरोग्य राज ठाकरेंच्या दोन चालकांना कोरोनाची बाधा !

राज ठाकरेंच्या दोन चालकांना कोरोनाची बाधा !


मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन चालकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर सेव्हनहिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या दोन सुरक्षा रक्षकांनादेखील कोरोनाची लागण झाली होती.

 

 

राज ठाकरेंच्या दोन चालकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सेव्हनहिल्स रुग्णालयात उपचार सुरू असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो. याआधी राज यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोन पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. ते कोरोनावर मात करून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले आहे. राज यांच्या घरात काम करणारे कर्मचारीदेखील विशेष काळजी घेत आहेत.


Protected Content

Play sound