Home Uncategorized राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शहिद जवानांना श्रद्धांजली (व्हिडिओ )

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शहिद जवानांना श्रद्धांजली (व्हिडिओ )

0
28

जळगाव, प्रतिनिधी । भारत व चीनच्या सीमेवर भारताचे २० जवान शहिद झाले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थतीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशपातळीवर होणाऱ्या घटनांवर अधिक लक्ष द्यावे. भारताची ताकद दाखवून देण्याची वेळ असून भारताची जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी असल्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी जवानांना श्रद्धांजली प्रसंगी दिली. त्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीत पंतप्रधानांनी कणखर भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/704292896814463/

 


Protected Content

Play sound