सावदा ता. रावेर । वाघोदा, चिनावल, कुंभारखेडा या परिसरात केळी ची मोठी बाजारपेठ आहे. या परिसरात दररोज चाळीस, पन्नास, ट्रक केळीची वाहतूक बाहेर राज्यात याचं मुख्य रस्त्याने मोठ्या प्रमाणात जड वाहनांनी केली जाते. मात्र, या रस्त्यांची दुरावस्था झाली असून तो लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वाघोदा, चिनावल, कुंभारखेडा या गावांना जोडणारा एकमेवर स्त्यांवर साधारण एक ट्रकचे दिडेश ते पावणे दोनशे क्विंटल वजन असते असे चाळीस ते पन्नास ट्रक धावत असतात. यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, बैलगाडी, ट्रक्टर ,रिक्षा सह मोटारसायकल यांची नेहमीच रहदारी असते. आताच पावसाळ्याचीही सुरूवात झाली असून, यामुळे सर्व सामान्य जनतेला या नादुरुस्त रस्त्यामुळे जाणे येणे खुप जिकिरीचे होतं आहे. शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहावयास मिळत आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे, संबंधित अधिकारी व ठेकेदाराने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.