मुख्यमंत्र्यांच्या घोषणांमुळे गोंधळ वाढला ; फडणवीसांची टीका

 

मुंबई (वृत्तसंस्था) पुनःश्च हरीओम, मिशन बिगिन अगेन या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांमुळे गोंधळ वाढला अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दापोलीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

यावेळी फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी पुनश्च हरिओम केल्यानंतर आता लॉकडाऊन कडक करावा लागेल, असे त्यांनी म्हटले. यामधून सरकारचा गोंधळ दिसत आहे. परंतु, सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी दृढनिश्चय हवा. हे सगळे गोंधळात टाकणारे आहे. उलट आता दृढतेने हे सांगितले पाहिजे की, जे काही सुरु करतो आहोत त्यामध्ये कितीही संकटं आली तरीही आम्ही त्याचा सामना करु. अर्थव्यवस्था सुरु करण्यासाठी लोकांना मदतही करावी लागेल. महाराष्ट्राला करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण मिळवावे लागेल. राज्यातील मंत्र्यांना कोरोना झाला, ही दुर्दैवी बाब आहे. त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. पण मुंबईतील परिस्थिती गंभीर आहे. राज्यातही मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. सरकारने त्याकडे लक्ष दिले पाहिजे,असेही फडणवीस म्हणाले.

Protected Content