धनंजय मुंडे फायटर आहेत, लवकरच सक्रीय होतील : राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्थ) सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कोणतीही लक्षणं नाहीत. तसेच ते फायटर आहेत लवकरच बरे होतील आणि पुन्हा एकदा सक्रीय होतील, असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

 

टोपे पुढे म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा एक रिपोर्ट निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांना कोणतीही लक्षणं जाणवत नसून श्वसनाचा त्रास होत आहे. यासाठीच आम्ही त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्याचे ठरवले आहे. मुंडे पुढील १० दिवसांमध्ये ते पुन्हा सक्रिय होतील. त्यांची प्रकृती चांगली आहे असंही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते. परंतू तेथे सोशल डिस्टन्सिंग सर्व नियम पाळण्यात आले होते, असेही टोपे यांनी सांगितले.

Protected Content