पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । पहूर शहरासह परीसरात गुरूवारी रात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या पाहिल्याच पावसात वाघूर नदीला पूर आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
गुरूवार ११ जून रोजी रात्री उशीरा पहूर शहरासह परिसरात ढगांच्या गडगडाट तर वीजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. यावेळी जगप्रसिध्दा अजिंठा लेणींच्या कुशीतून उगम पावलेल्या पहूर येथील वाघुर नदी ला रात्री दोन वाजेच्या सुमारास मोठा पूर आल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला वाघुर नदीला पूर आल्यामुळे गावातील नदी, नाले, विहीर, आडवे बोरिंग यांचा पाण्याचा प्रश्न मिटला असून रात्री दोन वाजेच्या सुमारास वाघुर नदीला पूर आल्याने आज सकाळी पूर पाहण्यासाठी नागरिकांनी नदी किनारी गर्दी केली होती. या पडलेल्या पाऊसमुले जमिनीत ओलावा निर्माण झाल्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आला आहे .सगळीकडे शेतात पेरणीच्या कामात मजूर वर्ग व शेतकरी दिसून येत आहे.