पहूर येथील दिशा लाठेचे दहावीच्या परिक्षेत यश

पहूर ता.जामनेर प्रतिनिधी । येथील ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे व पत्रकार रवींद्र लाठे यांनी पुतणी व कै.देविदास लाठे यांची मुलगी दिशा लाठे हिने शालांत परिक्षेत ९१ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

ब्राईट स्पार्क इंग्लिश स्कूल नाशिकची विद्यार्थ्यांनी दिशा देविदास लाठे हिने मार्च २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. तिला शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व तांबे, तसेच आई, आजी, आजोबा, मामा, काका, काकु यांचे मार्गदर्शन लाभले. दिशा लाठे हिचे यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content