Home आरोग्य रावेर तालुक्यात १०९ बाधीत; ४० रूग्णांची कोरोनावर मात !

रावेर तालुक्यात १०९ बाधीत; ४० रूग्णांची कोरोनावर मात !

0
53

रावेर शालीक महाजन । तालुक्यात एका दिवसात तब्बल २१ रूग्ण आढळून आल्याने कोरोना बाधीतांची संख्या १०९ वर गेली असली तरी आतापर्यंत ४० रूग्णांनी या विषाणूवर मात केली आहे.

रावेर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. गत २४ तासांमध्ये नवीन २१ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात तालुक्यातील चिनावल, ऐनपुर, वाघोदा बु आदी गावांमध्ये कोरोनाचा रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यात एकूण १०९ कोरोना पोझिटीव्ह पेशंट झाले आहेत. सुखद बातमी अशी आहे की आता पर्यंत ४० जण कोरोना पोझिटीव्ह बरे होऊन घरी गेले आहे तर ५५ जणांवर उपचार सुरु असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी शिवराय पाटील यांनी सांगितले. तर तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी रूग्णांचा रहिवास असणार्‍या भागांना कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करून परिसर सील केला आहे.


Protected Content

Play sound