Home राजकीय राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकीची ऑफर

राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकीची ऑफर

0
35


कोल्हापूर (वृत्तसंस्था) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकीची ऑफर देण्यात आली आहे.

 

 

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी तसा प्रस्ताव दिला आहे. याबाबत दोन दिवसात आपण निर्णय घेऊ. प्राथमिक चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांच्याशी यासंदर्भात थेट बोलणे झालेले नाही. जयंत पाटील माझ्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते, त्यावेळी आमच्यात प्राथमिक चर्चा झाली. यापुढे अजूनही चर्चा होणार आहे. दरम्यान, विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त एकूण 12 जागा भरायच्या आहेत. त्यामधील किमान चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतात. त्यामुळे शेट्टी यांच्यासारखा अनुभवी नेता विधानपरिषदेत जावा अशी शरद पवारांची इच्छा असल्याचे कळते.


Protected Content

Play sound