Home आरोग्य शेंदुर्णीत राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापनदिनानिमित्त कोरोना योध्दांचा सत्कार

शेंदुर्णीत राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापनदिनानिमित्त कोरोना योध्दांचा सत्कार


शेंदूर्णी प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकविसव्या वर्धापन दिनानिमित्त शेदुर्णीत कोरोना योद्धाचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जि.प.सदस्य संजयदादा गरुड यांच्याहस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

यावेळी शेंदूर्णी खरेदी विक्री संघाचे चेअरमन दगडू पाटील, संचालक राजेंद्र पवार, माजी सरपंच सागरमल जैन, शांताराम गुजर, शेंदूर्णी दक्षिण भाग विकास सोसायटीचे चेअरमन सुनील गरुड, धीरज जैन, गजानन धनगर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुरळकर, इतर कर्मचारी नर्स उपस्थित होते. दुसऱ्या एका कार्यक्रमात शेंदूर्णी दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे यांचा दगडू पाटील, पोहेका किरण शिंपी यांचा राजेंद्र पवार तर पोहेका प्रशांत विरणारे यांचा धीरज जैन तर निलेश धनगर, यांचा गजानन धनगर यांनी सत्कार केला. पत्रकार विलास अहिरे यांचा माजी उपसरपंच सागरमल जैन यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. शेंदूर्णी नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी साजिद पिंजारी, पाणीपुरवठा अभियंता काझी यांचा सत्कार दगडू पाटील, राजेंद्र पवार, सागरमल जैन, धीरज जैन, विलास अहिरे, गजानन धनगर यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी सांगितले की राज्यात गेल्या ४ महिन्यापासून कोरोना विषाणूचे संकट असून या काळात डॉक्टर, पोलीस, नगरपालिका अधिकारी कर्मचारी, पत्रकार हे आपले जीवन धोक्यात घालून जनतेच्या कमी येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१व्या वर्धापनदिन संपूर्ण राज्यात कोरोना योद्धा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात अधिकारी कर्मचारी यांचे सत्कार करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोरोना योद्धाच्या कायम पाठीशी राहणार आहे. यावेळी मुख्याधिकारी साजिद पिंजारी, सहाय्यक उपपोलिस निरीक्षक किरण बर्गे,वैद्यकीय अधिकारी राहुल निकम यांनी सत्कार केल्यामुळे कार्यासाठी नविन ऊर्जा मिळाल्याचे सांगितले.


Protected Content

Play sound