अयोध्या नगरात रस्ता डांबरीकरण कामाला महापौरांच्या उपस्थितीत सुरुवात !

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अयोध्या नगरातील मुख्य रस्ता अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यात आल्याने संपूर्ण खराब झाला होता. रस्त्याचे डांबरीकरण करण्यास महापौर भारतीताई  सोनवणे यांच्या उपस्थित सुरुवात करण्यात आली.

 

अयोध्या नगरात अमृत योजनेंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. नगरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाईपलाईन टाकण्यात आल्याने रस्ता पूर्णतः खराब झाला होता. परिसरातील नगरसेवकांनी याबाबत महापौर भारतीताई सोनवणे यांच्याकडे तक्रार केली होती. महापौरांनी सूचना केल्यानंतर राम मंदिरापासून ६०० मीटरचा रस्ता नव्याने तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. शुक्रवारी कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, सुनील खडके, डॉ.विश्वनाथ खडके, मीनाक्षी पाटील, रंजना वानखेडे, माजी नगरसेवक प्रदीप रोटे, विजय वानखेडे, गोकुळ पाटील, किसन मराठे, मनपा अभियंता योगेश बोरोले, मक्तेदार प्रतिनिधी बऱ्हाटे आदी उपस्थित होते.

Protected Content