राज्य सरकार रेमडेसिवीर औषधाची १० हजार इंजेक्शन खरेदी करणार

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकार रेमडेसिवीर औषधाची १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबद्दलची माहिती दिली आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिवीरचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी सुचवले होते.

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रयोगशाळा, प्राणी आणि वैद्यकीय अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये आशादायक परिणाम मिळाला असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे. रेमडेसिवीर औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचा दावा अमेरिकेकडून कऱण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयानेही याआधी भारतात कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीर औषधाची चाचणी केली जाणार असल्याचे सांगितले होते. या औषधाने करोनाचे विषाणू नष्ट होतात अशी माहिती असून हे औषध खूप महागडं आहे. गरिबांनाही ते उपलब्ध झालं पाहिजे यादृष्टीने राज्य सरकार १० हजार इंजेक्शन खरेदी करण्याचं ठरवले असल्याचेही एका मुलाखतीत टोपे म्हणाले होते.

Protected Content