यावल येथे आणखी एक कोरोना पॉझीटीव्ह तरुण रुग्णाचा मृत्यु ; मृतांची संख्या पाचवर

 

यावल, प्रतिनिधी । कोरोना संसर्गाचे थैमान तालुक्यात मोठया वेगाने सुरू झाले असुन मागील ३० दिवसात यावल तालुक्यात ३९ नागरीक हे कोरोना पॉझीटीव्ह आढळुन आले असुन , यातील पाच पॉझीटीव्ह रूग्णांचा आणि तिन संयशीत रुग्णांचा मृत्यु झाला आहे. सर्वत्र चिंतेचे सावट पसरले असुन प्रशासकीय पातळीवर आरोग्य यंत्रणा ही अलर्ट झाली आहे.

आज शनिवार दि. ६ जुन रोजी यावल व्यास नगर येथे वास्तव्यास असलेले व मुळ हातेड तालुका चोपडा येथील राहणारे व २९ वर्षीय बँकेत कर्जवसुली विभागाचे अधिकारी यांचे कोवीड१९ सेन्टरला उपचार घेत असतांना आज सकाळी ते मरण पावले आहे. मागील १५ दिवसापुर्वी त्यांची स्वॅब चाचणी करण्यात आल्यावर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता परंतु, मागील आठवड्यात त्यांना कोवीड१९ सेन्टर ला पाठविण्यात होते. दुसऱ्यांदा त्यांचे स्वेब चाचणी करण्यात आल्यावर ती पॉझीटीव्ह आली होती . दरम्यान आज उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाल्याचा वृत्ताला प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ . मानिषा महाजन आणि तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी दुजोरा दिला आहे . या मृत्युनंतर यावल शहरात कोरोनामुळे मृत्यु पावलेल्यांची संख्या ही एकुण पाच झाली असुन संयशीत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या |तिन आहे .मृत्युचा आकडा सातत्याने वाढत असल्याने नागरीकांमध्ये कमालीची अस्वस्था पसरली आहे .

Protected Content