चिंताजनक : जळगाव जिल्ह्यात आज नवीन ४४ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज पुन्हा नवीन ४४ कोरोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव ५, अमळनेर १०, रावेर ६, एरंडोल १, भडगाव १, जामनेर २, भुसावळ ५, चोपडा ९, चाळीसगाव २, धरणगाव ४ असे एकूण ४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या १००१ इतकी झाली असून जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ११५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आजच्या आकडेवारीतून अमळनेर आणि चोपडा तालुक्यांमध्ये संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. अमळनेरात मध्यंतरी स्थिती आटोक्यात आली होती. तथापि, अलीकडच्या काळात आधी प्रमाणेच रूग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तर चोपडा तालुक्यातील कोरोना बाधीतांचे प्रमाण देखील आता चिंताजनक झाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content